दुचाकी वाहन चोरांनी पुन्हा डोके वर काढले असून मुकुंदवाडी, सिटीचौक, वाळूज अशा तीन ठिकाणी चोरांनी डल्ला मारत तीन दुचाकी लंपास केल्या आहे.या प्रकरणी संबंधित पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलं आहे.
शेख राफीकुद्दीन मोहम्मद खुर्शीद वय-31 (रा.गणेश कॉलोनी) हे मौलाना आझाद महाविद्यालयात गेले असता त्यांनी त्यांची (एम एच 20 सिके1619) या क्रमांकाची दुचाकी बाहेर लावली असता ती लंपास करण्यात आली या प्रकरणी सिटीचौक ठण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तर संतोष रावसाहेब पाचे वय-26 (रा.गोल टगाव,ता.औरंगाबाद) यांचा भाचा योगेश चाळगेला सर्प दंश झाल्याने ते दुपारी तीन वाजेच्या सुमारास सुमनंजली रुग्णालयात गेले होते,तेथे त्यांनी (एम एच 20 इ.डब्ल्यु 8286) या क्रमांकाची दुचाकी लावली होती ती चोरी झाली या प्रकरणी मुकुंदवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तिसरी घटना वाळूज येथील बाजार गल्लीत घडली. अय्युब ईंना शाह फकीर (वय-36 रा.बायजीपुरा) हे नातेवाईकांकडे गेले असता त्यांची (एम एच 20 बीडी 1237) लंपास करण्यात आली.या प्रकरणी वाळूज पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.